बदलत्या जॉब मार्केटचा नवीन माइलस्टोन; टिंकर टाइम एज्युप्रेनर.

बदलत्या जॉब मार्केटचा नवीन माइलस्टोन; टिंकर टाइम एज्युप्रेनर. 

काळ बदलतो आहे आणि बदलत आहेत नोकरी करण्याच्या पद्धती टिपिकल ९ तो ५ जॉब आता लोकांना फारसे पसंत पडत नाही आणि म्हणूनच प्रत्येक वर्षी गिग इकॉनॉमीची प्रचंड ग्रोथ होत आहे. 

Manisha Jaybhaye, Sandhya Salunkhe, Purushottam Pachpande, Purushottam pachpande, Tinker Time, Thane EnterPrinuer
महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेत ठाण्यातील चिल्ड्रेन टेक सेंटरच्या - टिंकर टाईम एज्युप्रेनर उपक्रमाला द्वितीय पारितोषिक -    अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास संध्या साळुंखे यांच्या उपस्थितीत

इंजिनियरींग तसेच चांगले ग्रॅज्युवेशन करून सुद्धा किती तरी तरुण आज ऑनलाईन टॅक्सी ड्राइवर तसेच डिलेव्हरी बॉय चे काम करताना दिसत आहेत, आपण शिक्षण घेतलेल्या क्षेत्रात असलेल्या नोकरीचा अभाव किंवा उच्च शिक्षणाची तयारी करत असताना फेक्सीबल वर्किंग अव्हर्स मिळतात  म्हणून या तरुणाचा या कामांकडे ओढ असतो, किती तरी लोक डबल ड्युटी करताना दिसतात, दिवस भर ऑफिसमध्ये काम आणि संध्याकाळी फूड डिलेव्हरी जेनेकरून थोडे फार अधिक कमवता येईल. काम खर तर कुठलेच वाईट नसत पण आपण घेतलेल्या शिक्षणाचा यात काही उपयोग होत नाही किंवा या कामाचा अनुभव आपल्या पुढील करिअर मध्ये उपयोगी येणार नाही अशी खंत सर्वांमध्ये असते. 

तर दुसरीकडे शालेय शिक्षण पध्दतीमध्ये आमूलाग्र बदल होत आहे, ऑक्सफोर्ड च्या एका अभ्यासानुसार आजच्या निम्म्या नोकर्‍या ह्या पुढील २० वर्षांत स्वयंचलित होतील. म्हणजे हे जॉब अस्तित्वातच नसतील, यामुळेच शालेय विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, आर्टीफिशियल इंटेलिजन्ट, आय. वो. टी,   मशीन लर्निंग, ३ डि प्रिंटिंग, ड्रोन सारखे आधुनिक कौशल्य शिकवणे हे काळाची गरज आहे. खर तर केंद्र शासनाच्या अटळ इनोव्हेशन मिशन या योजनेच्या माध्यमातून असे उपक्रम राबवले जात आहेत पण तंत्रज्ञानाचे हे विषय शालेय शिक्षकांना शिकवणे फार अवघड जाते आणि म्हणूनच त्याची अंमलबजावणी म्हणावी तशी होत नाही. 

एकीकडे इंजिनीअर्स आहे ज्यांना योग्य जॉब नाही म्हणून ते काही तरी ऑड काम करतात  - तर दुसरीकडे शालेय विद्यार्थी आहेत ज्यांना रोबोटिक्स,३ डि  प्रिंटिंग, ड्रोन सारख्या आधुनिक विषयांचे कुतूहल आहे पण योग्य शिकवणारे कोणी नाही. 

या समस्यावर उपाय म्हणून ठाण्यातील पुरुषोत्तम पाचपांडे यांनी टिंकर टाइम या स्टार्टअप ची स्थापना केली, टिंकर टाइम एज्युप्रेनर या उपक्रमाअंतर्गत पुरुषोत्तम किती तरी युवकांना फेक्सिबल रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे.  २५ जून २०२२ रोजी ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ पद्दमभुषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे ठाणे येथे उद्घघाटन करण्यात आले. 

काय आहे गिग इकॉनॉमी ? 

Purushottam pachpande, Tinker Time, Thane EnterPrinuer

गिग म्हणजे एखाद्या व्यवसायिकाने घेतलेला एखादा प्रकल्प किंवा कामाचा करार असतो व हे काम निश्चित काळात पूर्ण करावे लागते. यासाठी कार्यालयातून किंवा ऑनसाइट (रिमोट लोकेशनवर) काम करू शकता. 

सध्या भारतात उपलब्ध गिग नोकरीच्या मुख्य संधी ओला, उबेर यासारख्या कंपन्यांचे मोबाइल अॅप्स, स्विगी, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट,  आदी ई-कॉमर्स संकेतस्थळे गिग नोकरीच्या संधी देताहेत. फ्लेक्सीऑर्ग डॉट कॉम, गेटमीएक्स्पर्ट‌्स डॉट कॉम आदी पोर्टल्स उमेदवारांना अशा कंपन्यांपर्यंत पोहोचण्यास मदत करत आहेत. भारतात कंटेंट रायटिंग, भाषांतर, निवड, विक्री, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, आर्किटेक्चर, बीआयएम, अकाउंटिंग, डेटा अॅनालिटिक्स, कन्सल्टिंग, काउन्सेलिंग आदी गिग जॉब्ज उपलब्ध होत आहेत.

करिअरमध्ये असे फायद्याचे ठरतात. गिग जॉब्स या क्षेत्रात व्यक्ती अनेक संस्थांसाठी काम करते. येथे ती व्यक्ती महिला की पुरुष? याच्या आधारे निवड किंवा करार केले जात नाहीत. ही नोकरी सहजपणे उपलब्ध होण्यासोबतच कमी खर्चाची व सुरक्षित असून येथे आपण व्यवसायाशी संबंधित शिक्षणही घेऊ शकतो. तसेच यात अनेक जबाबदाऱ्यांसह लवचीकताही मिळत असते.

पार्श्र्वभूमी

राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ जाहीर करण्यात आले आहे. सदर धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासाकरिता पूरक वातावरणनिर्मिती करून त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्याकरिता इनक्युबेटर्सची स्थापना, गुणवत्ता परीक्षण व बौद्धिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रँड चॅलेंज, स्टार्टअप वीक यांसारखे अनेक उपक्रम राबविण्यात येतात. नाविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात, त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते परंतु काही वेळा योग्य मार्गदर्शनाअभावी चंगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत. राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी शासनामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form