*दैनिक राष्ट्रसंचार* ने माझ्यासारख्याच इतर सर्व उद्योजकांना नवीन प्रेरणा द्यावी

पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही... म्हणतात ते खरं आहे. कारण आपला जन्म हा सामान्य शेतकरी कुटुंबात झालेला. उद्योग व्यवसाय हा कशासोबत खातात हेही माहित नाही.. दैनिक सकाळ (नागपूर), दैनिक लोकमत (मुंबई), इंग्रजी दैनिक डीएनए (मुंबई), हिंदुस्थान टाइम्स मध्ये जॉब करत असताना सतत वाटायचं कि छोटा का असेना परंतु आपला स्वतः चा काहीतरी व्यवसाय असावा.. जॉब चालू असतानाही सतत प्रयत्न करत असायचो... त्यातूनच मसाला बनवणे आणि विक्री करणे, चहाचा छोटा स्टॉल आणि कल्पना सुचेल त्या प्रमाणे वेगवेगळ्या व्यवसायांकडे बघू लागलो..  जमेल ते करू लागलो. 

Dnyaneshwar Bobade, Rashtra Sanchar, Pandurang Khutwad, Digiprint, Dhankawadi, Dhankawadi Business, Dhankawadi Udyojak,, Rashtra Sanchar News


दरम्यान वृत्तपत्रांचा काळ संपत आला. डीएनए बंद पडला, हिंदुस्थान टाइम्स हि बंद झाले. अचानक नोकरी गेली आणि दिशाहीन झालो. डोक्यावर कर्ज आहे आणि मिळकतीचा काहीच मार्ग नव्हता. मुलांचे शिक्षण आणि कर्जाचे हप्ते मनावर तणाव निर्माण करत होते. म्हणून मिळेल ती नोकरी करू लागलो. तुटपुंज्या पगारात भागत नव्हतं परंतु कशीतरी संसाराची गाडी चालत होती.. डोक्यात सतत स्वतः काहीतरी करूया असं वाटत होतं पण काय करावं हे सुचत नव्हतं... युट्युब, फेसबुक, गूगल वर सतत शोध चालू होता.. मित्रांशी चर्चा चालू होत्या. आईवडील तर सामान्य शेतकरी असल्याने त्यांना काही सांगू शकत नव्हतो. 


आता मात्र ठरलं.. आपल्याकडे जी कला आहे त्याच कलेचा फायदा घ्यायचा. .स्वतःचे डीटीपी सेंटर सुरु करायचे. ग्राफिक्स डिझायनिंग ची कामे करूया.. अडचणींवर मात करून दुकानाचा गाळा भाड्याने घेतला. आणि सुरु झाला स्वतः चा छोटासा व्यवसाय... नवीनच दुकान असल्याने ग्राहक दुकानाकडे फिरकत सुद्धा नव्हती. परंतु थोड्याच दिवसात हळू हळू ग्राहक येऊ लागले आणि किमान दुकानाच्या गाळ्याचे भाडे निघेल एवढे कमवू लागतो.. आणि अचानक अघटित घटना घडली... माहित नाही किती उद्योजक या भस्मासुराने गिळले..... 

करोना... होय या महामारीने नरक यातना वाट्याला आल्या. दुकान बंद करावं कि चालू ठेवावं कळत नव्हतं.. दुकानाचं भाडं वाढत चाललं त्याचप्रमाणे लोकडाऊनहि लांबत चालला. होतं नव्हतं तेव्हढं करोनाने गिळलं आणि सगळं संपलं... 

लोकडाऊन हळू हळू शिथिल होऊ लागला आणि मी हि पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी पायांना बळ देऊ लागलो. हळू हळू गाडी रुळावर येऊ लागली. खूप विचार करून मनाला वाटलं कि आपल्या सारखे अनेक जण आहेत ज्यांना या लोकंडावूनचा फटका लागला आहे. अनेक महिला, अपंग, स्वातंत्र्य सैनिक, वृद्ध यामध्ये होरपळून निघाले आहेत. 

समाजभान म्हणून *नवरात्रीत महिलांसाठी सवलत योजना* तयार केली.. ती लोकांपर्यंत पोहोचवली.... त्या योजनेचा समाजाने दखल घेतली... खूप खूप आभारी आहे दैनिक राष्ट्रसंचार चा ज्यांनी माझ्या या उपक्रमाची दखल घेतली. मला स्वतःहून *ज्ञानेश्वर बोबडे साहेबांचा* फोन आला आणि सांगितले कि तुमचा हा उपक्रम खरंच खूप चांगला असून प्रोत्साहन म्हणून *दैनिक राष्ट्रसंचार* मध्ये आपली बातमी येत आहे. फोन वर बोलून खूप आनंद झाला. आपली दखल घेणारं कुणीतरी आहे याची जाणीव झाली.. आपण समाजासाठी काहीतरी केलं तर समाजही आपल्याला काहीतरी देतो, याची जाणीव झाली.. अनेक समाजसेवी महिलांची, उद्योजिकांनी *डिजिप्रिन्ट ११११* या फेसबुक पेज ला लाईक करून आपली पसंती दर्शवली. 

*दैनिक राष्ट्रसंचार* चे खूप खूप आभार. सर्व उद्योग-व्यावसायिकांना अशीच प्रेरणा मिळाली तर निराशा हि आशेत बदलेन. प्रत्येक उद्योजकाच्या मनात एक नवीन प्रेरणा निर्माण होईल. 


दैनिक Rashtra Sanchar ज्यांचा हॅश टॅग आहे #राष्ट्रसंचार #rashtrasanchar आणि Dnyaneshwar Bobade साहेब याचा मी खूप खूप आभारी आहे. ज्यांनी माझ्यासारख्या छोट्याश्या व्यावसायिकाला प्रेरणा म्हणून दखल घेऊन प्रसिद्दी दिली. मी Pandurang Khutwad आपला खूप खूप आभारी आहै. , #Digiprint हे एक छोटेशे दुकान आहे. त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ रोड, धनकवडी #Dhankawadi येथे. Dhankawadi Business, 

धनकवडी येथे अनेक Dhankawadi Udyojak आहेत. त्या सर्वाना प्रेरणा मिळावी जेणे करून कठीण परिस्थितीतही कुणीतरी सोबत असल्याने धीर येतो आणि प्रोत्साहन मिळते. 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form